| म्हसळा | प्रतिनिधी |
कुणबी समाजोनती संघ शाखा तालुका म्हसळा (मुंबई) संलग्न युवक मंडळ, महिला मंडळ यांच्या विद्यमाने तसेच तालुका अध्यक्ष महेंद्र टिंगरे, सचिव राजू धाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दि. 21 डिसेंबर रोजी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजू जाधव हे करिअर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना संभोदित करणार आहेत. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आहे. करिअर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी क्षमता, आवड, शैक्षणिक मार्गदर्शन फायदे आणि तोटे यावर अधिक भर देण्यात येणार असून 10 वी आणि 12 वीनंतर स्पर्धा परीक्षा, कला, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.






