पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील घटना
| पनवेल | वार्ताहर |
मागील कित्येक दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथील शवागारातील दुर्गंधी उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरू लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त ठेवलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने संपूर्ण रुग्णालयात या उग्र दर्पाने सर्वजण हैराण झाले आहेत. शवागारातील कॉम्प्रेसर बंद पडल्याने हा उग्र दर्प वाढल्याचे सांगितले जात आहे.