खारेपाटात चिऊताईचा डंका

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-मुरूड आणि रोहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि.8) सायंकाळी खारेपाट भागात प्रचार करण्यात आला. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे आगमन होताच, मतदारांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ज्येष्ठ मतदारांसह, तरुण महिला मतदारांकडून त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे खारेपाटात चिऊताईचा डंका वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मविआ पुरस्कृत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी पेझारी येथे नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. यानंतर कुर्डूस, अवेटी या भागात प्रचार केला. मुरूडसह अलिबाग तालुक्यातील गावे, वाड्यांमध्ये चित्रलेखा पाटील यांना प्रचारातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी शुक्रवारी सायंकाळी खारेपाट परिसरात प्रचाराला सुरूवात केली. रेवसपासून कावाडे, हाशिवरे, सारळ, नवखार या भागात घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांची भेट घेतली. यावेळी खारेपाटातील कार्यकर्ते, मतदारांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारांचा पाठींबा वाढत असल्याचे पहावयला मिळाले. लडेंगे जितेंगे, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. एक वेगळा उत्साह या प्रचारादरम्यान दिसून आला. प्रचंड मताधिक्यांनी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा विजय होणार, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version