शेअर बाजारात तेजी

सेन्सेक्स 58 हजारांच्या पार
मुंबई | वृत्तसंस्था |
शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत 58 हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 58 हजारांच्या पार गेला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच 217 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स 58,069 वर पोहोचला. तर, निफ्टीत 66.20 अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी 17,300 अंकांवर पोहोचला होता.
जागतिक बाजारातील सकारात्मक परिणार शेअर बाजारावर दिसत आहेत. आशियाई बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. डॠद छखऋढध आणि ऊजथ ऋणढणठएड सध्या उलाढालही योग्य प्रमाणात सुरु आहे. दुसरीकडे अमेरिकेतही एलअँडपी 500 आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. आज रिलायन्स, जस्ट डायल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, व्होडाफोन आयडिया, अदाणी ग्रीन, पीएनबी आणि कोल इंडिया या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल दिसत आहे.

Exit mobile version