अजय जडेजाच्या दिलदारपणाची गोष्ट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतात झालेल्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजा यांनी अफगाणिस्तानच्या संघाचे मेंटॉर म्हणून काम केले होते. अफगाणिस्तानने त्या विश्वचषकात इंग्लंड, पाकिस्तान सारख्या बड्या संघांना पराभूत केले होते. तेव्हा अजय जडेजा यांना अफगाणिस्ताच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. मात्र, नव्या माहितीनुसार अजय जडेजा यांनी अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाकडून एक रुपया देखील फी म्हणून घेतलेला नाही.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओंनी चर्चा करताना याबद्दल भाष्य केले आहे. अजय जडेजा यांनी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये अफगाणिस्ताला जे मार्गदर्शन केले, त्यासाठी बोर्डाकडून देऊ केलेली रक्कम घेण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले होते की, तुम्ही चांगले क्रिकेट खेळा तेच माझ्यासाठी बक्षीस आणि पैशासारखे असेल, असे अजय जडेजा म्हणाल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी सांगितले.

Exit mobile version