• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

Antara Parange by Antara Parange
July 25, 2025
in पोलादपूर, रायगड, लेख
0 0
0
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

थरकाप उडविणाऱ्या 25 अन्‌‍‍ 26 जुलैच्या आठवणी

| पोलादपूर | शैलेश पालकर |

25 व 26 जुलै 2005 रोजी पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजविला. काय झाले असेल? कानावर येणाऱ्या बातम्या अफवा तर नसतील ना? खरंच तसे घडलं असेल तर? प्रत्येकाच्या मनातील मानवतावादी विचार अंत:करण चर्रऽऽ करीत होता. तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्र तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन्‌‍‍ भाताची रोपेही सोबत वाहून नेत होती. वीस वर्षांपूर्वीच्या 2005 च्या 25 अन्‌‍‍ 26 जुलै या दोन दिवसांची आठवण ताजी होतेय. काय-काय घडले होते त्या दिवशी? महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगांव, रोहन गावांत धरणीमातेच्या उदरात अनेक मानवी देह गाडले गेले, तोच प्रकार पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक आणि लोहारे पवारवाडीमध्येही झाला. आपत्ती निवारणाच्या साधनांची कमतरता वाटेल इतपत महाडचा प्रसंग भीषण होता. त्यामुळेच पोलादपूर तालुक्यातील मनुष्यहानीच्या प्रसंगात गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच कशेडी घाटातील दरड हटविण्यासाठी कोणतीही तातडीची उपाययोजना होऊ न शकल्याने पोलादपूरचे जनजीवन तब्बल 11 दिवस ठप्प राहिले.

पोलादपूरचे वाचनालय इमारतीसह वाहून गेले. गंगामाता सभागृह वाहून गेले. सुंदरराव मोरे महाविद्यालय वाहून गेले. जुना महाबळेश्वर रस्ता खचला. सरकारी गोदामातील शेकडो टन धान्य भिजले. पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये पुराने छातीत धडधड वाढवली. गेल्या 100 वर्षांत असा पूर कधी कोणी पाहिला नव्हता.त्यावेळी 82 वर्षांचे असलेले राम गुरूजी यांना घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी सांगितले. वीजमंडळाच्या गोदामाची इमारत आणि शेजारची टपरीवजा हॉटेलची शेडही वाहून गेली. चित्रेंच्या घाटावरील तीन छोटी मंदिरेही फूटून वाहून गेली.

पोलादपूर तालुक्यात आजमितीस 41 जेसीबी आहेत, पण त्याकाळी एक जेसीबी उपलब्ध न झाल्याने कोतवाल बुद्रुकमध्ये कृष्णा सकपाळ, गोपीबाई सकपाळ, काशीनाथ सकपाळ, कांता सकपाळ, राकेश सकपाळ, गीता सकपाळ आणि निखिल सकपाळ सारं कुटुंबच गाडलं गेलं आणि ते जेसीबीअभावी प्रेतं सडल्याने काढताही आली नव्हती. पैठणचा पूल वाहून गेला. कोतवाल खुर्दमध्येही तीनजण गाडली गेली. शेतजमिनी वाहून गेल्या. घरांना तडे गेले. दरडींनी घरं व्यापली. मोठमोठे दगड चेंडूसारखे टप्पे घेत काही घरांच्या कौलांतून पोटमाळयांवर येऊन थांबले. चरईच्या पुलाजवळ उत्तरवाहिनी सावित्रीचे पात्र दिशा बदलून परतले. बंडू चित्रेची चाळ वाहून गेली. बोरावळे येथे डोंगराला भेगा पडल्या. अनेक घरं दुभंगली. तुटवलीत डोंगर खचला अन्‌‍‍ पुलही वाहून गेला. लोहारे पवारवाडीत जमीन दुभंगली अन्‌‍‍ घर दुभंगून दोघे गाडले गेले. दोघे बचावले. दिविलचा के.टी. बंधारा फुटला. कशेडी घाटामध्ये डोंगर आमराईसह मुंबई-गोवा महामार्गावर उतरला अन्‌‍‍ घाट बंद झाला. प्रत्येक गावाची बातमी कधी हुश्श अन्‌‍‍ नेहमीच अरेरेऽ! करायला लावणारी होती. वीजपुरवठा तीन दिवस ठप्प, कारण अनेक विजेचे खांब वाहून गेले अन्‌‍‍ काही तुटून कोसळले. कोंढवी भागामध्येही जमिनीला तडे गेले. घरामध्ये दरडी शिरल्या. कोतवाल खुर्दच्या एका घराच्या पोटमाळयावर आजही एक मोठी दरड स्थिरावलेली दिसून येत आहे.

अनेक गावांतील पाणीयोजना, रस्ते, झाडं, साकव, पूल, बंधारे, संरक्षक भिंती, स्मशानशेडस्‌‍‍ अशा विकासकामांना या अस्मानी संकटाने गिळलं. लेप्रसी हॉस्पिटलसमोरील ब्रिटिशकालीन पूलही दुभंगण्याचा धोका निर्माण झाला. अतिवृष्टी किती तब्बल 100 इंचांपेक्षा जास्त! भूस्खलन किती? तेही हजारो एकरामध्ये! महापुरामध्येही सडवलीतील म्हातारी वाहून गेली तर कोतवाल खुर्दमध्येही तसंच झालं… शेजारच्या महाड तालुक्यातील दासगांव, रोहन, जुई-कोंडीवते या गावांत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. पण, पोलादपूरंच स्वत:च्या दु:खामध्ये होतं. त्यामुळे कोण दुसऱ्याच्या दु:खावर फुंकर घालणार?

यानंतर सामाजिक संघटना, मानवप्रेमी संघटना, मंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, मंत्री जयंत पाटील यांच्याकडून दूधपुरवठा, सरकारी पंचनामे, सरकारी मदत, सार्वजनिक मालमत्तेची हानी मोजणी, भूस्खलनाची कारणमीमांसा, जखमींना मदत, मृतदेह शोधण्याचे काम सुरू, मृतांच्या नातेवाईकांना मदत, रस्ते अन्‌‍‍ घाट मोकळा करण्याचे प्रयत्न, मोफत रॉकेल पुरवठा, साखर, तांदूळ व घरगुती वस्तूंचे वाटप, पूरग्रस्त व दरडग्रस्तांची जगण्याची धडपड पुन्हा सुरू झाली. काहींना उगीचच मदत लाटली तर काहींनी वस्तूरुपी मदत देण्यास विरोध दर्शविला.

25 आणि 26 जुलै 2005 न विसरता येणाऱ्या घटनाक्रमांचा काळ आणि केवळ काळच जो पोलादपूर तालुक्यात दोन दिवस ठाण मांडून तब्बल दहा जणांचे बळी घेणारा ठरला. अनेकांचे संसार उघड्यावर आणले. आता सर्व आठवणी मनात घर करून आहेत. पण, धास्ती कायमच आहे. कोतवाल खुर्द व कोंढवीसह अनेक गावांमध्ये दरडग्रस्तांना घरकुलं देण्याची पूर्ण सज्जता झाले आहे. आधार संस्था असो वा सिध्दीविनायक अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला. स्वत:चं घर मिळण्यास विलंब झाल्याने काही पुन्हा दरडग्रस्त घरामध्ये राहू लागले आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या सरकारी अहवालामध्ये सर्व सत्य मांडले आहे. आपत्ती निवारण कायदा 2007 निर्माण झाला, पण सरकारी अधिकाऱ्यांना त्याची धास्ती दिसत नाही.

Related

Tags: heavy rainindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladpurraigadsocial media newssocial news
Previous Post

पावणेचार कोटींचा गुटखा जप्त; चार आरोपींना अटक

Next Post

अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना दणका

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!
sliderhome

बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!

May 26, 2026
Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
sliderhome

Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

May 26, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: खारेपाटकरांची अजूनही पाण्यासाठी वणवण

May 26, 2026
Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!
sliderhome

Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

May 26, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

खांदा वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित

May 26, 2026
Next Post
अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना दणका

अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?