सरकारकडून मागणी मान्य
| मुंबई | दिलीप जाधव |
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला राज्यातील तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्या संपावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश बगळे यांनी जाहीर केले.
नायब तहसिलदार वेतनश्रेणी त्रुटी बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून 4800 रुपयांच्या वेतनश्रेणी वाढीला मान्यता दिली असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. महसूल संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश बगळे म्हणाले की, सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. तसेच या वेतनश्रेणी वाढीला वित्त खात्यानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही संप मागे घेत असल्याचे जाहीर करीत आहोत, असे सांगितले.