उष्णतेच्या उकाड्याने विद्यार्थ्यांना असह्य

Thermometer Sun 40 Degres. Hot summer day. High Summer temperatures

शाळा ऑनलाईन घेण्याची : पुंडलिक पाटील

| कर्जत | प्रतिनिधी |

एसबीएससी व सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये झाल्या. त्यानंतर त्या परीक्षांचे निकाल लागून एप्रिल महिन्यात शाळा सुरू झाल्या. यंदा एप्रिल महिन्यात तापमान 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाताना असह्य होत आहे. हा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा ऑनलाईन कराव्यात, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी केली आहे.

एसबीएससी व सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये असतात आणि त्या परीक्षांचा निकाल मार्चअखेरीस असतो. परीक्षा व निकाल या कालावधीत विद्यार्थ्यांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील वर्षांची शाळा होते. आणि मे महिन्यात पुन्हा सुट्टी लागेल. यंदा उष्णतेची लाट असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे असह्य होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापन समितीला निर्देश देऊन काही दिवसांकरिता शाळा ऑनलाईन करायला सांगावे. त्यामुळे लहान मुलांना उष्णतेचा त्रास कमी होईल. याबाबत जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

माझ्या मुलाला मी यंदा शाळेत प्रवेश घेतला आहे. पहिल्या दिवशी तो उत्साहात शाळेत गेला; परंतु शाळेतून आल्यावर उष्णतेमुळे तो गर्भगळीत झाला होता. त्यामुळे मी मुलाला शाळेत पाठवत नाही. यंदा खूप उन्हाळा आहे. चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असल्यामुळे विशेषतः लहान मुलांना त्याचा त्रास होतो.

अ‍ॅड. राहुल देशमुख,
पालक, कर्जत
Exit mobile version