बेलोशी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकण एज्यूकेशन सोसायटी आंतरशालेय स्पर्धा रोहा तालुक्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये पार पडली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील को. ए. सो. लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन प्रकाश खडपे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक प्रमोद भोईर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

आंतरशालेय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वकृत्व , गीत, गायन, निबंध व चित्रकला स्पर्धेत बेलोशी हायस्कूलमधील एकूण 13 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव लौकीक केले. चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवीमधील विद्यार्थी पार्थ जाधव याने द्वितीय तर, आठवीमधील विद्यार्थी पुष्कर खडपे याने प्रथम क्रमांक मिळविला. वकृत्व स्पर्धेत किमया कापडी, अदिती पाटील, वैधवी वाघमारे. गीत गायन स्पर्धेत जुई पाटील. निबंध स्पर्धेत निमिषा पाटील, सिध्दी लोहार, श्रावणी म्हात्रे, आर्या थळे यांनी यश मिळवून शाळेचे नाव लौकीक केले आहे. तसेच नववी व दहावीमध्ये मराठी, हिंदी, व इंग्रजी विषयात क्रमांक एकचे गुण मिळविणारी शाळा ठरल्याने शाळेला नागु मास्तर ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version