कामगाराचा शॉक लागून मृत्यू
| उरण | वार्ताहर |
महावितरण कंपनीच्या उपअभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे रवींद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.27) दुपारी घडली. तरी बेजबाबदार उपअभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या उरण कार्यालयात रवींद्र पाटील (रा. बोकडविरा) हे कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून मुळेखंड तेलीपाडा या परिसरात काम करत होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले होते. मुळेखंड तेलीपाडा येथील विद्युत वाहक दुरुस्तीचे काम करण्यासाठी दुपारच्या सत्रात विद्युत वाहक पोलवर गेले असता त्यांना शॉक लागण्याची घटना घडली. त्यातच रवींद्र पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्या राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.