वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश

| श्रीवर्धन | वार्ताहर |

आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. ’वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 वरिष्ठ प्रशिक्षक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

दरम्यान, गुरुवर्य अविनाश मोरे, प्रसाद विचारे आणि रितेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धनचे वरिष्ठ खेळाडू अनिकेत साखरे, कृतार्थ कोलथरकर, युक्ता मुरकर, श्रुतिक वाणी, सिद्धी सावंत यांनी रायगडचे प्रतिनिधीत्व करताना उत्तम खेळाचे प्रदर्शन करुन उत्तम यश संपादन केले. या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच सर्व प्रशिक्षक खेळाडूंना सदर खेळाचा अनुभव मिळावा या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वायुद्ध हा खेळ आपल्या देशाची संस्कृती, भारतीय योग व व्यायाम प्रकार, कुस्ती इ. सर्वांचे एकत्रीकरण करुन बनविला गेला आहे. भविष्यात हा खेळदेखील पाश्‍चिमात्य देशांतील कराटे, कुंगफु, किक बॉक्सिंग प्रमाणे जगभरात प्रसिध्द होईल.

संतोष मोहिते, संस्थापक, वायुद्ध असो. ऑॅफ इंडिया
Exit mobile version