| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रावण महिन्यात महिलांधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी कुळकर्णी हॉलमध्ये भव्य मश्रावणसरी नृत्यस्पधेर्चेफ आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नटेश्वर संघ, श्रीवर्धन हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. स्नेह संघ, दिवेआगर व सिद्धकला संघ, श्रीवर्धन हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. समाजातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षीपाककला स्पर्धा, दिवाळींत किल्ले स्पर्धा,नृत्य स्पधा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण सात महिला नृत्य संघांनी सहभाग घेतला होता.
विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे महिला ब बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युक्ता मुरकर यांनी केले. नृत्य स्पर्धांचे परीक्षण अस्मिता सुर्वे यांनी केले. याप्रसंगी प्रवितामाने, सबा फिरफिरे, राजसी मुरकर यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खूप मेहनत घेतली.