| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या परीक्षेत इयत्ता 8 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता येते. या परीक्षेत शाळा स्तरावरून हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना बसविले जाते. या परीक्षेचा आशय व कठिण्यपातळी उच्च दर्जाची असते. गुणवंत व प्रज्ञावान मुलांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
या परीक्षेला सर.एस.ए. हायस्कूल मुरुड या शाळेकडून ऋग्वेद कल्पेश बुल्लू याला बसविण्यात आले होते. ऋग्वेदने 72 % इतके गुण मिळवून मुरूड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. याबद्दल जंजिरा विद्यामंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर व सर्व संचालक सर.एस.ए.हायस्कूलचे मुख्याध्यापक सरोज राणे,गणित तद्न्य आदर्श शिक्षक संदेश चोरघे यांनी अभिनंदन केले आहे. मुरुड तालुक्यातील समस्त कोळी समाज याबद्दल ऋग्वेदचे कौतूक करीत आहे. तसेच तालुक्याचे तहसिलदार रोहन शिंदे गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.