शेतकरी,कष्टकर्‍यांचा आधारवड कोसळला – शरद पवार

प्रा.एन.डी.पाटील यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील सर्वच राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे.एनडींच्या जाण्याने सर्वसामान्य,कष्टकरी,दुर्बल जनतेचा आधारवड कोसळला असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. जुन्या पिढीचा शिलेदार गमावला – शरद पवार

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील, कष्टकरी, शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या जुन्या पिढीतील शिलेदाराला गमावलं आहे. एनडी पाटील यांचा विचारधारा ही जहाली होती आणि त्या विचारसरणीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं. त्यांनी व्यक्तीगत सुख, घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता. डाव्या विचारसरणीने सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी संघर्ष आणि दुसर्‍या बाजून उपेक्षित घटकांच्या शिक्षणसाठी जे दरवाजे खुले केले त्यामध्ये कर्मवीरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवले. राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिशेला होतो, ते त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक होते,
रयत शिक्षण संस्था बनल्यानंतर मी अध्यक्ष आणि एनडी पाटील चेअरमन होते. त्यामध्ये त्यांनी झोकून देऊन काम केले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या, शाहू फुलेंच्या विचाराने जनतेसाठी अखंडपणे काम केले. संघर्षमय जीवनात त्यांनी कधी अपयश घेतले नाही. आरोग्याच्या प्रश्‍नावरही यापूर्वी त्यांनी दोन ते तीन वेळा मात केली होती. पण यावेळी हा योद्धा वाढत्या वयामुळे यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे एनडी पाटील आज आपल्यात नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

Exit mobile version