सर्वे डोंगराचा भाग धोकादायक

दगड-माती रस्त्यावर येण्याची भीती ?
| कोर्लई | वार्ताहर |

गेली दोन दिवस जोरदार पडत असलेल्या पावसाने अलिबाग-मुरुड रस्त्यावर दांडा ते सर्वे दरम्यान रस्त्यावर फणसाड अभयारण्य क्षेत्रात असलेल्या सर्वे डोंगराचा ढस ढासळून वेळप्रसंगी रस्त्यावर माती-दगड येऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन फणसाड अभयारण्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे. मागील काही वर्षापूर्वी सर्वे डोंगराचा ढस ढासळून माती व मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. फणसाड वन्यजीव अभयारण्य व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्वे डोगराचा काही भाग उतरवून उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

3जुलै 2020 रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ तसेच मागील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वादळी पावसानंतर पुन्हा सर्वे डोगराचा ढस ढासळून माती दगड खाली आले होते. चारपाच दिवस जोरदार पडलेल्या पावसामुळे साळाव-मुरुड रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था असून कोर्लई, बोर्ली, मांडला परीसरात रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आल्याने खड्डे पडले आहेत. वेळ प्रसंगी काही दिवस पावसाचा जोर राहिल्यास, मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यास या डोंगराचा ढस ढासळून माती व दगड रस्त्यावर येण्याची व वाहतुकीवर परिणाम होण्याची तसेच वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून व फणसाड अभयारण्यच्या संबंधित अधिकार्‍यांनी पाहाणी करून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.

Exit mobile version