स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील काही सोसायटीत एक अज्ञात संशयित इसम सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याचा शोध सुरू आहे. सदर इसमाची माहिती मिळताच कळविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात तसेच परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा तपास देखील सुरू आहे. त्याच दरम्यान शहरातील ठीकरुळ नाका परिसरात काही दुकानांच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात एक अज्ञात इसम संशयितरित्या वावरत असताना आढळून आला आहे. या इसमाचे छायाचित्र प्रसिद्ध करीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू आहे.
सदर इसमाची माहिती मिळताच ईश्वर लाबोटे, 9604570593 यांच्याशी मोबाईलवर कळविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.