टँकर चालकाला लुटले

। पनवेल । वार्ताहर ।
अद्यात अज्ञात त्रिकूटाने गॅस टँकर चालकाला मारहाणकडून लुटल्याची घटना पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडली. गॅस टँकर चालक साजिद कयूम अंसारी (30) हा गॅस टँकर क्र. एम.एच. 12 एन एक्स 8881 ने मुंबई-पुणे एक्स्प्रेसने पुणे येथे जात असताना अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या टीशर्ट व हाफ पॅन्ट घातलेल्या दोन इसमांनी त्याची गाडी अडवून, गाडीत चढून त्याला जबरदस्तीने खाली खेचून त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या अंधारातून आलेल्या तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या जीन्स पॅन्ट-टीशर्ट घातलेल्या एका इसमाने त्याच्या कपाळावर लाकडी काठीने मारून त्याला जखमी केले. तर, इतर दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल व टीशर्टच्या खिशातील रोख रक्कम रुपये 7000 जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते तिघे जण पळून गेले. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version