शिक्षकांनी जपले विद्यार्थ्यांचे हित

| पेण | प्रतिनिधी |

राज्यभरात नविन पेंशन योजनेवरना रद्द करण्याबाबत व जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत राज्यसरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संपाची साथ घातली आहे. त्यामुळे सुरू असणार्‍या 10 वी च्या परिक्षेवर त्यांचा परिणाम होईल असा सर्वत्र सोशल मिडीयावर मेसेज फिरत असताना, पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित जपण्याच्या दृष्टीने आज संपामध्ये सामिल असताना देखील 10 वी च्या परिक्षांचे पेपर घेण्यासाठी शिक्षक उपस्थित राहिले. आणि आपण शिक्षकच आहोत याचा एक प्रकारे दाखला दिला.

पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी स्वतः पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील परिक्षा केंद्राला भेट देउन काही अडथळा तर निर्माण झाला नाही ना याचा आढावा प्रा. अंजली जोशी यांच्या कडून घेतला आणि प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, शिक्षक जरी संपात सामिल असले तरी त्यांनी आज आपला शिक्षकी धर्म पाळत विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होउ नये म्हणून हजेरीवर सहया न मारता कामात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांचे हित जपले.

Exit mobile version