घरफोडीमुळे गावी गेलेले शिक्षक चिंतेत

| सुतारवाडी | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांपासून भुरटे चोर बंद असलेले ब्लॉक घरे फोडून किमती ऐवज पळविणे, हाती काहीच लागले नाही. तर सामानाची नासधूस करणे असे प्रकार घडत आहेत. विशेषतः दिवाळी आणि मे महिन्यात मोठ्या सुट्ट्या असतात, अशावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नोकरीनिमित्त रायगडमध्ये आलेले आहेत, ते दीर्घ सुट्टीत आपल्या पुणे, सातारा, बार्शी, बीड, मालेगाव, नाशिक, चंद्रपूर, पालघर तसेच अन्य ठिकाणी जातात. मात्र, या संधीचा फायदा भुरटे चोर घेऊन बंद असलेली घर फोडून किमती ऐवज सामान घेऊन पोबारा करतात.

यावर्षी (दि.7) मे रोजी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शिक्षकवर्ग आपल्या गावाकडे गेला. मात्र, घरफोडीच्या बातम्या वाचून किंवा ऐकून त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावर निर्माण झाले आहे. भुरटे चोर बंद असलेली घरे फोडून पोबरा करतात. हे चोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत, ही आश्‍चर्याची बाब आहे. अशांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. नाहीतर भुरट्या चोरांचा आत्मविश्‍वास वाढून चोर्‍यांचे प्रमाण वाढेल.

Exit mobile version