| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा आश्चर्यकारक सामने पाहायला मिळतात. कधी कुणी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा पराक्रम करत, तर कधी कुणी एका ओव्हरमध्ये विकेटचा चौकार मारत. मात्र आता क्रिकेट विश्वात एका संघाने अक्षरश: कहर केला. टी-20 लीगच्या फायनल सामन्यात 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 16 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या अर्ध्या फलंदाजांनी खातेही उघडले नाही. अंतिम सामन्यात अशा लाजिरवाण्या पराभवामुळे संघाने अनेक नकोसे विक्रमही आपल्या नावावर केले.
खरंतर, झिम्बाब्वे देशांतर्गत टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि.9) मार्च रोजी खेळला गेला. डरहम आणि मॅशोनालँड ईगल्स हे संघ विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने होते. डरहमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डरहमने 20 षटकांत 6 गडी गमावून 229 धावा केल्या. 230 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल्स संघ 8.1 षटकांत म्हणजे 49 चेंडूंत 16 धावांत गारद झाला. संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
टी-20 इतिहासातील तिसरी सर्वात कमी धावसंख्या अशाप्रकारे, झिम्बाब्वे देशांतर्गत टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डरहमने 213 धावांनी मोठा विजय मिळवला आणि चॅम्पियन बनले. ईगल्सने केलेल्या 16 धावा ही टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. तत्पूर्वी, बिग बॅश लीगमध्ये आयल ऑफ मॅन संघ 10 धावा करून ऑलआऊट झाला होता आणि सिडनी थंडर संघ 15 धावांवर.