| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात 72 वर्षीय महिला जखमी झाली. या अपघाताप्रकरणी टेम्पोचालका विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली करपे आणि त्यांची आई सुलोचना करपे या दि. 30 डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. त्या प्रभाग क्रमांक 11 येथील भाजी मार्केटच्या बाजूने चालत जात असताना चारचाकी टेम्पोने एका दूचाकीला धडक दिली. आणि ती दुचाकी सुलोचना करपे यांना पाठीमागून येऊन जोरात धडकली. त्यात सुलोचना करपे गंभीर जखमी झाल्या.
टेम्पोची दुचाकीला धडक
