। नवीन पनवेल । वार्ताहर ।
टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नावडे फाटाकडून एमआयडीसी कडे जाणारा ब्रिज उतरून टेम्पो क्रमांक एम एच 43 यू 8437 वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. व अचानक यूटर्न घेतल्याने तळोजा एमआयडिसी कडून येणारी केटीएम मोटरसायकल क्रमांक एम एच 46 बीएस 5500 हिस ठोकर मारली. यात मोटरसायकल वरील दोन्ही इस्माना गंभीर दुखापती झाले आहेत. जखमी यश प्रकाश पाटील (वय अठरा) व आकाश हे दोन्ही पेंधर गावातील आहेत.