अ‍ॅक्टीव्हा गाडीची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या कमानीजवळ रिक्षा स्टँडसमोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवलेली ग्रे रंगाची होंडा अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. राज मंजनर यांनी त्याच्या ताब्यातील दहा हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची होंडा अ‍ॅक्टीव्हा मोटारसायकल उभी करून ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version