प्रवाशाच्या हातून मोबाईल खेचून चोरटा फरार

| पनवेल | वार्ताहर |

रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या हातावर फटका मारून अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली. अजित गोवलकर असे या प्रवाशाचे नाव आहे. ते साखळोली येथे येण्यासाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने प्रवास करत होते. पनवेल रेल्वे स्टेशनवरून गाडीने प्लॅटफॉर्म सोडल्यानंतर काही अंतरावर ते डब्याच्या दरवाजाजवळ मोबाईल हातात घेऊन बसले होते. त्यावेळी रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या अज्ञात चोरट्याने गोवळकर यांच्या हातावर फटका मारला. त्यामुळे त्यांच्या हातातील मोबाईल गाडीखाली पडला. त्यानंतर या चोरट्याने तो मोबाईल उचलून तेथून निघून गेला. याप्रकरणी गोवळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version