चोरीचा मोबाईल वापरणं पडलं महागात

| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वतःला वापरण्यासाठी त्याने मोबाईलची चोरी केली होती. मात्र ही चोरी त्याला चांगलीच महागात पडल्याचे समोर आले आहे. नागोठणे पोलिसांनी शुक्रवारी त्याला त्याच्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासीवाडीमधील 25 वर्षीय तरुणाला मोबाईल वापरण्याची आवड निर्माण झाली. मात्र मोबाईलच्या किंमती परवडण्यासारख्या नसल्याने तो विकत घेऊ शकत नव्हता. एका बंद घराच्या उघडया खिडकीतून तो घरात घुसला. त्याने वेगवेगळ्या कंपनीचे 48 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल तेथून लंपास केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नागोठणे पोलिसांद्वारे चोरट्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा काही शोध लागत नव्हता. मोबाईलमध्ये चोरट्याने नवीन सिमकार्ड टाकले. त्यामुळे मोबाईल पुन्हा सुरु झाल्याने सायबरसेलद्वारे त्याचा शोध लागला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष म्हात्रे, पोलीस शिपाई रामनाथ ठाकूर, पोलीस नाईक डुमणे, पोलीस हवालदार रसाळ, महिला पोलीस हवालदार प्रतीक्षा गायकवाड, महिला पोलीस शिपाई नम्रता अय्यर यांचे एक पथक तयार करण्यात आले. सायबर सेलमधील तंत्रज्ञानाचा अज्ञधार घेत त्याला शुक्रवारी त्याच्या राहत्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेतले.

Exit mobile version