। पनवेल। वार्ताहर ।
अज्ञात चोरट्यांनी एका विवाहित महिलेस धक्काबुक्की करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून मोटार सायकलीवरून पसार झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील डेरवली बस स्टॉप जवळ घडली आहे. स्वाती पाटील या बहिणीची वाट पाहत बस स्टॉप जवळ थांबल्या असताना दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून येऊन तीला धक्काबुक्की करून जखमी व तिच्या गळ्यातील 1लाख 20 हजार रुपये किमतीचे मणी, सोन्याचे मंगळसूत्र खेचून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
