पनवेलमध्ये वाजणार मनोरंजनाची तिसरी घंटा

आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृह केले सॅनिटायझर
पनवेल । वार्ताहर ।
कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेली नाट्यगृहे शासन निर्णयानुसार 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहदेखील नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले असून, रंगमंच व प्रेक्षागृह याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोव्हिडची पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये 50 टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरूवात झाली होती. तथापि, कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेत रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून 22 ऑक्टोबरपासून नियंत्रित स्वरूपात नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

Exit mobile version