करोनाची तिसरी लाट?

ओडिशात 138 मुलांना संसर्ग
नवी दिल्ली | वृत्तंस्था |
बंगळुरूमध्ये गेल्या 10 दिवसात 500 हून अधिक मुलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये 138 मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने आकडेवारी जारी केली. त्यात 1 हजार 58 जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 138 मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाचा आकडा 9 लाख 94 हजार 565 पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 376 रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये 162, जाजपूरमध्ये 77 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे 27 जिल्ह्यात 100 हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही करोना रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात 16, कटकमध्ये 12, नयागरमध्ये 13 मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात 36 हजार रुग्ण
भारतात गेल्या 24 तासांत 36 हजार 083 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 493 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 38,667 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या 24 तासांत 37,927 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे 2337 सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे. आतापर्यंत 3 कोटी 21 लाख 92 लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 13 लाख 76 हजार बाधितांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या 3 लाख 85 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Exit mobile version