| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत 658 गोवरचे रुग्ण सापडले असून, संशयित रुग्णांची संख्या 10 हजार 234 इतकी आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरांमध्ये गोवरचे 44 रुग्ण आढळले असून 303 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवरची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते या पार्श्वभूमीवर हे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. गोवरचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण वाढविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून शून्य ते पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे की, नाही याची माहिती घेण्यात येत आहे.