ठोंबरे चाकणकरांवर संतापल्या

| मुंबई | प्रतिनिधी |

पक्षात मी नाराज नव्हते, मला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलं आहे, पण रुपाली चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते, त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे, अशा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यातील राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या 7 आमदारांचा शपथविधीही पार पडला. त्यामध्ये, महायुतीमधील भापज पक्षाला 3, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 जणांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या निवडीनंतर पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून पंकज भुजबळ आणि इद्रीस नायकवाडी यांना आमदारकीची संधी मिळाली आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनाही पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, पुण्यातील राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तर, आता रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकर यांच्या निवडीवर भाष्य करताना टोला लगावला आहे.

Exit mobile version