पेण एटीएम दरोड्याप्रकरणाचे धागेदोरे गुलदस्त्यातच

बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा; नागरिकांची मागणी
। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील स्टेट बॅक ऑफ इंडियाची दोन एटीएम फोडून त्यातील 56 लाख चोरुन नेणार्‍या चोरट्यांचा माग काढण्यात पेण पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.या चोरीप्रकरणी बँक व्यवस्थापनाविरुद्धच गुन्हे दाखल करण्याची मागणी पेणच्या नागरिकांकडून होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली होती.चोरट्यांनी सनसिटी इमारतीमधील स्टेट बँकेची दोन एटीएम फोडून त्यातून 56 लाख 34 हजार 800 रूपये दरोडेखोरांनी लंपास करून पोबारा केला आहे. ही एटीएम मशिन सनसिटी इमारतीच्या तळमजल्यावर होती. त्या खोलीला कोणत्याही प्रकारचे सुरक्षतेच्या दृष्टीने बॅकेकडून यंत्रण राबविलेली नव्हती. महत्वाची बाब या खोलीत दोन एटीएम मशिन होत्या. त्या खोलीस सीसी कॅमेरे लावलेले नव्हते. तसेच सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केलेली नव्हती. ज्या एटीएममध्ये जवळपास कोटीच्या घरात रक्कम ठेवली जाते त्या खोलीला सीसी कॅमेरे व सुरक्षा रक्षक न ठेवणे हे किती योग्य आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.ज्या दोन मशिन मधून 56 लाख रूपये चोरीस गेले आहेत त्या मशिन मध्ये दोन दिवसा पूर्वीच 84 लाख रूपये जमा केले होते. जर एवढ्या मोठया प्रमाणात रक्कम एटीएममध्ये ठेवले जात असतील तर त्याची पूर्ण सुरक्षतेची जबाबदारी ही बॅक प्रशासनाची असते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच एवढ्या मोठया प्रमाणात चोरी होउन पोलिसांच्या हाती अजून धागेदोरे लागत नाहीत.तपासासाठी आठ टीमकडून पास सुरू झालेला आहे परंतु 48 तास उलटून जाउन ही पोलिसांच्या हाती ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत. दरोडेखोरांचा शोध लावण्याकरिता फॉरेन्सिक पथकाची व श्‍वान पथकाची मदत घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे सापडले असून मुंबई व पुण्याच्या दिशेने पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे हे आठही पोलीस पथकांच्या थेट संपर्कात असून हाती आलेल्या पुराव्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version