| रसायनी | प्रतिनिधी |
वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे आयोजित वासांबे प्रिमियर लीगचे दोन पर्व उत्साहात पार पडले. त्यामुळे यंदाही वासांबे-मोहोपाडा प्रिमियर लीग पर्व 3चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 2025 सालचा खेळाडू लिलाव सोहळा नुकताच पानशील-मोहोपाडा येथील वृंदावन फार्म येथे पार पडला.
वासांबे प्रिमियर लीग पर्व 3 मध्ये एकूण 12 संघांची नोंदणी झाली आहे. या लिलाव सोहळ्यासाठी 12 अष्टपैलू, 12 फलंदाज, 12 गोलंदाज यांसह नियमित नोंदणी झालेल्या अशा एकूण 227 खेळाडूंचा यादीमध्ये सहभाग झाला होता. या लिलावात यंदाचा सर्वाधिक बोली लावण्यात आलेला खेळाडू तन्वीर चौधरी हा ठरला आहे. या प्रिमियर लीगमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक व रोख रक्कम असून दुचाकी, एल.ई.डी टीव्ही, लकी ड्रॉ सारखे अन्य पारितोषिकांची खेळाडूंना जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी पर्व 3च्या चषकाचे अनावरण देखील उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टि.के. माळी, संतोष चौधरी व रोशन पाटील यांनी पार पाडले.
वासंबे प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात राजवाड्याचा राजा या संघाने पहिले पारितोषिक पटकाविले होते; तर, दुसऱ्या पर्वात श्री गणेश इलेव्हन गणेश नगर या संघाने पहिले पारितोषिक पटकावले होते. मात्र, तिसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार, याची मोठी चुरस प्रेक्षकांना सामन्यादरम्यान पाहायला मिळणार आहे.
12 संघांची नोंदणी
वासांबे प्रिमियर लीग पर्व 3मध्ये एकूण 12 संघांची नोंदणी झाली आहे. त्यात विघ्नेश इलेव्हन वरोसे, धैर्यशील इलेव्हन आई एकविरा लोधीवली, कपिल एंटरप्राईजेस रीस, आई टाकेदेवी दांड फाटा, एन डिज नक्ष वेदांत इलेव्हन कांबे, श्री गणेश इलेव्हन गणेश नगर, यश युवराज इलेव्हन चांभार्ली, कैवल्य मंथन इलेव्हन मोहोपाडा, अनन्या इंटरप्रायजेस तळेगाववाडी, मल्लिकार्जुन खाने आंबिवली, बल्लाळेश्वर आळी आंबिवली व राजवाड्याचा राजा या संघांचा समावेश आहे.







