यंदा अलिबागमध्ये दहीहंडीचा थरार; शेकापच्या मानाच्या दहीहंडीची नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून घोषणा

 अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
संपूर्ण जिल्ह्यात नावाजली जाणारी अलिबाग शहरात शेकापक्षातर्फे साजरी होणारी दहीहंडी यंदा पुन्हा त्याच जोमाने साजरी केली जाणार आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रविवारी ( 31 जुलै)  याबाबतची घोषणा केली.कोरोनामुळे ही दहीहंडी दोन वर्षे स्थगित करण्यात आली होती.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.   नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे   गेल्या दोन वर्षांपासून अलिबागमधील दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. 19 ऑगस्ट रोजी गोपाळकाल्यानिमित्त अलिबागमधील शेतकरी भवनसमोर हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सव स्पर्धेचे स्वरूप तालुकास्तरीय असून अटींचे पालन करणार्‍या गोविंदा पथकाला प्रवेश देण्यात येणार आहे.असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

Exit mobile version