प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या स्थापना दिनानिमित्त माथेरानच्या थंड वातावरणात पर्यटकांना अश्वशर्यतींचा थरार पाहावयास मिळाला. नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्यावतीने ऑलिम्पिया रेसकोर्स वरील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे दोन दिवस अश्व शर्यती पार पडल्या. येथील ऑलिम्पिया रेसकोर्स येथे प्रमुख अश्वपालकांकडून घोडेसवारी शिवकिली जाते. शिकतात. गेल्या पन्नास वर्षांची परंपरा अबाधित राखत माथेरान युथ सोशल क्लबच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष प्रदीप दिवाडकर आणि अध्यक्ष प्रशाम दिवाडकर यांच्या संकल्पनेतून या अश्वशर्यतीचे आयोजन केेले जात आहे. या शर्यतींमध्ये आहे. प्रदीप दिवाडकर यांच्या नंतर या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रशाम दिवाडकर व त्यांच्या सहकार्यांच्या जाते. या शर्यतींमध्ये सहभाग घेतला होता. माथेरान सोशल क्लब आणि माथेरान नगरपरिषद यांच्याकडून या शर्यतीचे आयोजन केले घेण्यासाठी मुंबई, पुणे येथून शर्यतीचे चाहते उपस्थित होते.
माथेरान आणि माथेरान बाहेरील असे शेकडो अश्व जॉकी हे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यात मुंबई, नाशिक, पुणे, गुजरात येथील जॉकी यांनी सहभाग घेतला होता. अश्व जॉकी यांच्यासाठी गॅलपिंग, ट्रॉटींग, म्युसिकल बॉल अँड बकेट, सॅडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ व्हॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबँक, म्युसिकल मग्स ऑन हॉर्स बँक, टॅट पेगिंग अशा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत, लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेसमध्ये पर्यटकांना सुद्धा यात भाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. पर्यटकांसाठी रिले रेसचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि मुंबई, पुणे येथील घोडेस्वारांनी आपले कसब दाखवत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अश्वशर्यतीमधून माथेरानचा वाढदिवस साजरा केला.
अध्यक्ष प्रशाम दिवाडकर आणि संस्थापक अध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या माध्यमातून आयोजित अश्वशर्यती साठी प्रसाद सावंत, अजय सावंत, विवेक चौधरी, चंद्रकांत चौधरी, लक्ष्मण कदम, संदीप शिंदे, निता नेहलानी, दिनेश आखाडे,अनिल भरूचा हे चीफ जज होते तर कासम शेख, किरण पेमारे, प्रवीण सकपाळ, किरण जाधव, तुकाराम आखाडे, अफतर खान तर चीफ गेस्ट म्हणून जयप्रकाश रावल यांनी काल पाहिले. स्पर्धेतील झेंडा दाखवण्याचे काम पी के आण्णा आणि हैदर शेख यांनी तर स्कोरर म्हणून किरण पेमरे, सहिद कुरेशी, ग्राउंड मन म्हणून भालचंद्र सावंत आणि जयराम पाडिर तर उद्घोषक म्हणून प्रसाद सावंत आणि श्रेयस गायकवाड यांनी काम पाहिले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे, सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे आणि महावितरण कनिष्ठ अभियंता संतोष पारधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
हर्षिल दवे – विजेता. सुफीयन शेख- उपविजेता. बेस्ट रायडिंग हॉर्स- अमेझॉन – मालक राजू पटेल, हॉर्स शो विजेता डोरो घोडा – मालक निधी जाधव
संदीप शिंदेना जीवन गौरव पुरस्कार
माथेरान युथ सोशल क्लब आणि नगरपालिकेच्या वतीने शर्यतींच्या माध्यमातून माथेरानचा वाढदिवस साजरा करण्यात पर्यटकही सामील झाले. हा दिवस पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरला. पर्यटन, अश्वशर्यत आणि माथेरानचा वाढदिवस हा त्रिवेणी संगम पर्यटकांनी ऑलिंपिया रेसकोर्स येथील घोडेस्वार संदीप शिंदे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.