माथेरानमध्ये अश्‍व शर्यतीचा थरार

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान मधील जेष्ठ अश्‍वपालक कै. खलील महाबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र हैदर महाबळे यांनी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपच्या माध्यमातून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे भव्य अश्‍वशर्यतींचे आयोजन केले होते. त्यास स्थानिक तसेच मुंबई मधील अनेक घोडेस्वारांसह प्रेक्षकांनी, पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दिवशी झिग झ्याग रेस, ट्रॉटिंग रेस (पर्यटकांसाठी), बॉल एन बकेट, बटन रेस, गलेपिंग गोल्फ ऑन हॉर्स बॅक (पर्यटकांसाठी), कॅरिंग द बलून (पर्यटकांसाठी), मुलांसाठी ट्रॉटिंग रेस, टग ऑफ वॉर खुली स्पर्धा.

दुसर्‍या दिवशी आदिवासी लोकांसाठी धावण्याच्या शर्यती, टेरिट रॅगिंग खुली स्पर्धा, मुजिकल मग ऑन हॉर्स बॅक (पर्यटकांसाठी), रिले ट्रॉटिंग रेस स्थानिक व पर्यटकांसाठी आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये मुंबई येथील घोडेस्वार मुर्तुझा मोरबीवाला सर्वोत्कृष्ट घोडेस्वार ठरला, उप विजेता यश शिंदे आणि ओंकार आखाडे यानेही उत्तम कामगिरी बजावली. पंच म्हणून संदिप शिंदे, लक्ष्मण कदम, वसीम महाबळे, प्रशाम दिवाडकर, दिनेश आखाडे, किरण जाधव यांनी जबाबदारी पार पाडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी हैदर महाबळे, करन संघवी, नरेन महामुनकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version