झिराडमध्ये रंगणार कबड्डीचा थरार

निमंत्रित 128 संघांचे खेळाडू दाखविणार नेत्रदिप कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती तथा साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने झिराड येथील साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्यावतीने जिल्हास्तरिय कबड्डीचा थरार रायगडकरांना पहायला मिळणार आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर घेण्यात येणारी ही स्पर्धा 28 ते 30 दिवस रंगणार आहे.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनेही कबड्डी स्पर्धा होणार आहे.तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा जिल्हा स्तरिय महिला गट, जिल्हा स्तरिय पुरुष गट असा वेगवेगळ्या गटात होणार आहे. जिल्हास्तरिय महिला गटात 16 संघ सहभाग घेणार आहेत. त्यात प्रथम क्रमांक मिळविणार्‍या संघाला 30 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येक दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा स्तरिय पुरुष गटात 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात प्रथम क्रमांकाला 50 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 30 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ संघाला प्रत्येकी 20 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.

अलिबाग-रेवस पंचक्रोशी गटात 32 संघ, सागरगड पंचक्रोशी गटात 16 संघ व बामणगाव पंचक्रोशी गटात (पुरुष) 16 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाला 40 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 20 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 10 हजार रुपये व चषक दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट पक्कड, उत्कृष्ठ चढाई, सर्वेात्कृष्ठ खेळाडू, व पब्लिक हिरो या खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. झिराडमध्ये येथे होणार्‍या कबड्डी खेळातून खेळाडूंसह कबड्डी प्रेमींना एक खेळाच्या माध्यमातून एक वेगळी पर्वणी मिळणार आहे.कोटकोरोनामुळे दोन वर्षे मैदानी खेळांना निर्बंध होते. त्यामुळे कबड्डी, क्रीकेट सारखे खेळ खेळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोना आटोक्यात आल्यावर सरकारने सर्व निर्बंध हटविले. क्रिकेट कबड्डी खेळाडूंना व्यासपिठ देण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर अलिबाग प्रिमिअर लिग क्रीकेट स्पर्धा घेण्यात आली. आता प्रो कबड्डीच्या धर्तीवर झिराड या ठिकाणी कबड्डीच्या खेळाडूंसाठी भव्यदिव्य अशी कबड्डीची स्पर्धा साई क्रीडा मंडळ व महिला मंडळाच्यावतीने आयोजित केली आहे. ही नेत्रदिपक अशी स्पर्धा ठरणार आहे.- दिलीप भोईर, माजी समाजकल्याण सभापती, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version