| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव प्रीमिअर लीग 2022 दुसर्या पर्वाला सोमवार दि. 5 डिसेंबरला सुरुवात होत असून हि स्पर्धा 11 डिसेंबरपर्यंत माणगाव मोर्बा रोड मार्गावरील अल्ताफदादा धनसे यांच्या मैदानावर रंगणार आहे. हि स्पर्धा संपूर्ण माणगावकरांची असून या माणगाव प्रीमिअर लीगचा क्रिकेट शौकिनांनी मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन प्रीमिअर लीगचे संस्थापक अँड. राजीव साबळे, संजय ढवळे, संतोष खडतर, दिपक जाधव, निलेश केसरकर, भाई दसवते, मंगू जाधव,वैभव टेंबे, नंदुरज वाढवळ, बाळा पोवार, रोहित रातवडकर, फहद करबेलकर, राहुल बक्कम, सागर पाशिलकर, केदार जाधव, निलेश उभारे, मुकुल मेहता, वैष्णव साठे, समीर महाडिक व सहकार्यांनी केले आहे.
या माणगाव प्रीमिअर लीगमध्ये एकूण 24 संघ सहभागी होणार असून प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक चषक ,द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये व आकर्षक चषक,तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये व आकर्षक चषक,चतुर्थ पारितोषिक 15 हजार रुपये व आकर्षक चषक,पाचवे पारितोषिक 15 हजार रुपये व आकर्षक चषक,सहावे पारितोषिक 15 हजार रुपये व आकर्षक चषक अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली असून इतरही अनेक वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.