उद्यापासून पीएनपी चषकाचा थरार

आ. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन; कुरुळच्या आझाद मैदानावर रंगणार स्पर्धा

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु. व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कुरुळ येथील आझाद मैदानावर पाच दिवस 21 फेब्रुवारीपर्यंत टेनिस क्रिकेटचा थरार रंगणार आहे. एकुण 24 संघांमध्ये दिवस-रात्रीच्या स्पर्धा होणार असून, स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या धर्तीवरचा आनंद या स्पर्धेतून मिळणार आहे.



शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक माजी आ. पंडित पाटील, माजी आ. बाळाराम पाटील असणार आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यू.व्ही स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य गणेश मढवी, रायगड पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष देवा पाटील, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सुपर प्लेअर्स आंबेपूर, जिजा अंश 11 संघ, ए 3 सोगाव संघ, अमृत स्पोर्ट्‌स सासवणे, त्रिशव्या 11 वरसोली, सुरेश काका 11 वरसोली, रेड हॉर्स 11 नवगाव, अक्षय्या हॉटेल चेंढरे, प्रसाद 11 अलिबाग, साईकृपा साई नगर खंडाळे, 7700 जिजाऊ 11 चेेंढरे, आझाद 11 कुरुळ, प्राणशी 11 रोहा, मुस्कान 11 मांडला, यशश्री बिल्डींग कन्स्ट्रक्शन थेरोंडा, श्रावणी स्पोर्ट्स चौल, रुद्र वॉरिअर्स आक्षी, सिया वॉरिअर्स नागाव, नाखवा वॉटर स्पोर्ट्‌स साखर, प्रदीप स्पोर्ट्‌स साखर, रोशनशू 11 केतकीचा मळा, ज्ञानी 11 नांगरवाडी, ए.बी. ग्रुप अलिबाग, आदिरा वॉरिअर्स कावाडेे या संघांमध्ये रायगड जिल्ह्यातील पहिली सर्वात मोठी डे-नाईट क्रिकेट स्पर्धा 17 ते 21 या कालावधीत पहावयास मिळणार आहे. अंतिम विजेत्या संघास रोख पाच लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख तीन लाख रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला रोख दोन लाख रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध आकर्षक बक्षिसेदेखील दिली जाणार आहेत.

घरबसल्या पाहता येणार स्पर्धा
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात होणाऱ्या डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा प्रत्यक्ष जवळू पाहण्यासाठी सुसज्ज अशी पाच हजार क्षमतेची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घरबसल्यादेखील या स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी यूट्यूबवरदेखील स्पर्धा पाहण्याची सोय केली आहे.
Exit mobile version