| पुणे | प्रतिनिधी |
बाणेर येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यांच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पुणे लीग ‘सतेज करंडक’ स्पर्धेची सांगता शनिवारी (दि. 20) झाली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे लीगमध्ये झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने माय मुळशी संघावर 47-43 विजय मिळविला. मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघाकडे 24-15 अशी आघाडी होती. शिवनेरी जुन्नर संघाच्या प्रणव बांगर याने चढाईत 20 गुण मिळविले. शुभम बिटके याने 9 गुण मिळविले. तर, प्रवीण बाबर याने 4 व स्वप्नील कोळी याने 3 पकडी घेतल्या.
महिलांच्या अंतिम सामन्यात वेगवान पुणे संघाने शिवनेरी जुन्नर संघावर दणदणीत विजय मिळवित सतेज करंडक पटकाविला. मद्यंतराला वेगवान पुणे संघाकडे 18-9 अशी आघाडी होती. वेगवान पुणे संघाने संपुर्ण सामन्यात 4 बोनस गुण मिळविले. तर, दोन गुण लोणचे व एक गुण तांत्रिक गुण मिळविला. शिवनेरी संघाने 6 बोनस गुण मिळविले. वेगवान पुणे संघाच्या प्रज्ञा कासार हिने चौफेर चढाया करीत 12 गुण मिळविले व आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. साक्षी गावडे हिने 3 व निकिता खाडे हिने 2 चांगल्या पकडी घेतल्या.