| खोपोली | प्रतिनिधी |
पोलीस हा शिक्षा देणारा क्रूर माणूस असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळे कुमारवायात एखादा गुन्हा घडल्यास भीतीपोटी घर सोडून जाणे किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दादा आपला मित्रच असल्याची भावना सांगण्यासाठी तसेच आईवडील आपले मित्र आहेत त्यांच्याशी दिलखुलास बोला, यासंबंधीची जनजागृतीसाठी नगरपालिकेच्या वासरंग शाळेत रायगड वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद मार्गदर्शन केले आहे.
खोपोली नगरपालिकेच्या वासरंग शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, वाहतूक पोलीस हवालदार संजय सताणे, पो.शि. प्रवीण रणमिळे, धीरज तुपे, पो.ह. झेमसे, शाळेच्या मुख्याध्यापिका, श्री. भोसले आदी उपस्थित होते.
पोलीस विभागात स्त्री-पुरुष असा विचार न करता एकत्र काम करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितले. आपण आपल संरक्षण केलं पाहिजे, तुम्हाला हातपाय चालवता आले पाहिजेत. आई वडिलांना चांगले मित्र समजले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे 18 वर्ष झाल्यावरच गाडी चालवली पाहिजे प्रत्येक व्यक्तींमधे एक पोलीस आहे, तुम्हाला तुमच्या कर्तव्याचा जाणीव असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
तुमच्या हातून कुठलीही चूक झाली तर तुम्ही ती तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगितली पाहिजे. ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्याच्या मागे लागले नाही पाहिजे, सायबर क्राईमपासून सावध राहा, असे अवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी करीत आईवडिलांशी सर्व गोष्टी सांगा, पोलीस दादा, ताई आपले मित्र आहेत, असेही जाधव यांनी सांगितले.