| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील केवाळे पुलावरुन ट्रक पलटी झाल्याची घटना शनिवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यातील चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
कळंबोली येथून (एमएच-04-एलई-0268) क्रमांकाचा सहा चाकी ट्रक पनवेलच्या दिशेने चालला होता. केवाळे येथे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने केवाळे येथील पुलाच्या लोखंडी रेलिंगला धडक दिली आणि तो खाली कोसळून पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यातील चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.