। पनवेल । वार्ताहर ।
आकुर्ली येथे चार चाकी कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. कारचालक विकास अंबाजी महाबदी (राहणार विहिघर) याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
केवाळे येथील अंजली जनार्दन भोईर ह्या त्यांचे पती व मुलगा अनय असे मोटारसायकल एम एच 06 ए.जे 8152 ने प्रवास करत होत्या. त्यावेळी कार क्रमांक एम एच 04 जी.डी 9852 वरील चालक विकास महाबली याने मोटारसायकलला समोरून ठोकर मारली. या अपघातात अंजली भोईर व त्यांचा मुलगा अनय भोईर (वय 10 ) हे जखमी झाले आहेत. अपघात 25 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास झाला. अपघातानंतर कारचालक पळून जात होता. यावेळी नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.