। पनवेल । वार्ताहर ।
एका महिलेच्या मर्जीशिवाय जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिने विरोध केला असता तिला शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार का केली, असे चिडून तिच्या नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका इसमास गजाआड केले आहे.
शिव उर्फ राज पांडे (42) उलवे याने तक्रारदार महिलेच्या मर्जीशिवाय जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिने विरोध केला असता तिला शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.