एकाचा मृत्यू, एक जखमी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागोठणे पोयनाड मार्गावर दुपारच्या सुमारास दुचाकी स्वार पोयनाडच्या दिशेने जात होते तर रिलायन्स कंपनीची बस कामगारांना घेऊन नागोठाण्याच्या दिशेने जात असतांना वळणावर दुचाकी स्वाराचा ताबा सुटल्याने तो बसवर धडकल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला.
नागोठणे पोयनाड मार्गावर दुपारी 2 च्या सुमारास रिलायन्स कंपनीची बस आपल्या कामगारांना घेऊन नेहमी प्रमाणे नागोठणेकडे जात असतांना पोयनाडच्या दिशेने वेगाने येणार्या दुचाकी स्वाराचा ताबा सुटला आणि सांबरी जवळील वळणावर बसला जाऊन धडकला.
धडक इतकी जोरात होती दुचाकीचे काही भाग इकडे तिकडे विखुरले त्याच बरोबर दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर कोसळल्यामुळे बेशुद्धा पडले त्यांना लगेचच रिलायन्स कंपनीच्या दुसर्या बसमध्ये उचलून कंपनीच्या दवाखान्यात उपचार्या साठी नेण्यात आले आहे.
असे समजते की, दुचाकी वरील व्यक्ती मच्छी पकडण्यासाठी नदीत गेले होते तेथून ते मच्छी घेऊन आपले गाव आवेटी येथे परतत असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली.