कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील तळोजा गाव भारत पेट्रोल पंपाच्या जवळ झालेल्या विचित्र अपघातात कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जाबीद हुसेन हा भावाला घेण्यासाठी दहिसर येथे मोटारसायकलवरून येत असताना तळोजा गाव भारत पेट्रोल पंपाच्या जवळ त्याच्या उजव्या बाजूने येणार्‍या कंटेनरवरील चालकाने भरधाव वेगाने कंटेनर चालवून त्याच्या मोटारसायकलीस धक्का लागल्याने, जाबीद हुसेन हा डाव्या बाजूने जाणार्‍या दुसर्‍या कंटेनरच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या चाकाखाली आल्याने त्यात तो गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version