काबूल हल्लयाचा सूत्रधार मारला गेल्याचा अमेरिकेचा दावा

Security personnel and onlookers stand at the site of a blast along the roadside in Lashkar Gah, the capital of Helmand province on November 12, 2020. - An Afghan journalist working for a US-funded radio network was killed in a blast in southern Afghanistan on November 12, officials said, just days after a former television presenter was murdered in Kabul. (Photo by NOOR MOHAMMAD / AFP)

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
काबुल विमानतळावरील आत्मघाती बॉम्बहल्ल्यानंतर अमेरिकेने अवघ्या 48 तासांत आयसिस-के या दहशतवादी गटाच्या छावण्यांवर हल्ले केले. यामध्ये कटाचा सूत्रधार ठार झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
काबुल विमानतळावरील आत्मघाती बॉम्बहल्ल्यात 169 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकी सैनिकांचा बळी गेला होता. इस्लामिक स्टेटच्या अफगाणिस्तानातील आयसिस -के अर्थात आयसिस खोरासन गटाने या हल्लयाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा देण्यात आला होता.
नांगरहार प्रांतात आयसिस के गटाच्या ठिकाणांवर आम्ही स्वयंचलित विमानातून हल्ले केले असून त्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले.
अर्थात काबुल विमानतळावरील आत्मघाती बॉम्बहल्ल्यात आयसिस के गटाचा खरोखर सहभाग होता की नाही, याची शहानिशा अजूनही झालेली नाही. तसेच अमेरिकेने केलेल्या हवाईहल्ल्यात प्राथमिक अंदाजानुसार जरी शेकडो लोक मारले गेले असले तरी नागरिकांची किती जीवितहानी किती, याची माहिती मिळालेली नाही.

Exit mobile version