| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील बैठकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांची एकजूट अधिक भक्कम झाली आहे, असे प्रतिपादन शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. देशातील लोकशाहीला नख लावणाऱ्या मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी निर्धार केला आहे. यापुढे राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन ‘इंडिया’च्या नेत्यांच्या सभा होतील. पुढचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे व त्यावर सर्व विरोधकांचे एकमत आहे.