गणित अभ्यासक राजेश सुर्वे यांचे मत
| कोर्लई । वार्ताहर ।
शालेय शिक्षणात इयत्ता सातवी ते दहावी गणित पाठ्यपुस्तकातील वर्तुळाचे क्षेत्रफळ इतर आकृतींचे घनफळ व पृष्ठफळ काढण्यासाठी वापरण्यात येणारा ‘पाय’ 3.14 व 22/7 चुकीचा आहे. अचूक उत्तरासाठी 3.1428 या ‘पाय’ चा विचार करणे ही काळाची गरज असल्याने याच ‘पाय’ चा वापर होणे महत्त्वाचे असल्याचे गणित अभ्यासक राजेश सुर्वे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
शाळेतील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या गणित भाग ‘पाय’ या पाठ्यपुस्तकातील वर्तुळाचे पाय 227 व 3.14 चुकीचे असल्याबाबत राजेश सुर्वे यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सेक्रेटरी, संचालक यांच्या कडे 18 मार्च 2024 रोजी पत्रव्यवहार केला असता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी आपल्या कार्यालयाच्या कार्यकक्षेत बाब येत नसल्याने पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी राजेश सुर्वे याचे पत्र राज शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्याकडे वर्ग केले होते.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ संचालक यांनी सदर पत्राची दखल घेऊन इयत्ता दहावी गणित भाग पाय या पाठ्यपुस्तकातील त्रुटीबाबत कळवलेले आहे. सदर कळवलेली त्रुटी गणित विषय समिती सदस्यांपुढे विचारार्थ ठेवण्यात आली होती. याबाबत समिती सदस्यांच्या अभिप्रायानुसार इयत्ता सातवी पृष्ठ 75 व पृष्ठ 76), इयत्ता आठवी (पृष्ठ 5), इयत्ता नववी (भाग 1, पृष्ठ 23 व पृष्ठ 24) या इयत्तांच्या गणित पाठ्यपुस्तकात या संकल्पनेबद्दल आवश्यक तेवढे विवेचन दिले आहे.
‘पाय’ ही अपरिमेय संख्या असली तरी व्यवहारात या संख्येचे आकलन होण्यासाठी तिची अंदाजे किंमत 227 परिमेय संख्येच्या रूपात किंवा 3.14 वापरली जाते. हे पाठ्यपुस्तकात नमूद केले आहे. त्यामुळे ‘पाय’ ची दोन्हीपैकी कोणतीही किंमत घेऊन काढलेले उत्तर बरोबरच आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना आहे. तसेच इयत्ता आठवीच्या (पृष्ठ 103) गणित पाठ्यपुस्तकात क्षेत्रफळाचे सूत्र तयार करण्याची पद्धतीसुद्धा दिली आहे.
‘पाय’ ची एकच किंमत सर्वमान्य असल्याशिवाय पाठ्यपुस्तकात ती देणे शक्य नाही त्यामुळे आपण केलेल्या विनंतीनुसार पाठ्यपुस्तकात बदल करणे संयुक्तिक नाही. असे मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.