नुकसानग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

। कोर्लई । वार्ताहर ।
बोर्ली-मांडला पंचक्रोशीमध्ये मध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित असून शासनाकडून नुकसान ग्रस्ताना तातडीने मदत देण्यात न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टीने मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला भागात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मागील महिन्यात याबाबतचे एक निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत व बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरुड तहसीलदारांना देण्यात येऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.याबाबत निवेदन देण्यात आले होते.
शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.परंतु दिड महिना झाला तरी अद्यापही नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात न आल्याने परीसरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version