ग्रामस्थांकडून रस्त्यासाठी श्रमदान

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. लोक प्रतिनिधी व प्रशासनाने आदिवासी भागातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील लोकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. वारे चिंचवाडी देवपाडा रस्ता हा अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे मागणी करूनही बांधकाम विभागाकडून दुरुस्ती होत नसल्याने चिंचवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे भरले.

वारे- देवपाडा- चिंचवाडी भागातील आदिवासी वाड्या पाड्यांतील लोकांना नेरळ जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे, काही वर्षांपूर्वी ह्या रस्त्याचे काम झाले होते. मात्र ठेकेदारांनी निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने अल्पावधीतच या रस्त्याची चाळण झाली. या रस्त्यावर घसरून वाहनचालकांचअपघात होत आहेत. तीव्र चढाव व उताराच्या या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यावर प्रवासकरून अनेक वाहनधारकांना पाठीच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत तर गाड्यांचा ही खुळखुळा झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने दखल नघेतल्याने या भागात सामाजिक उपक्रम राबविणार्‍या आदिमानव अकॅडमी चे यश सप्रे यांनी चिंचवाडी ग्रामस्थांना एकत्र केले सर्वांच्या सहकार्याने श्रमदान करून खड्डेमय रस्त्यावरील उखडलेलं खडी बाजूला करून खड्यात मातीचा भराव टाकून खड्डे भरण्यात आले. यावेळी अबाल वृद्धासह शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन श्रमदान केले.

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक सेवाभावी लोक काम करत असतात आम्ही आमच्या आदिमानव अकॅडमी तर्फे ही उपक्रम राबवित असतो. या भागातील आदिवासींना दळणवळना साठी महत्वाचा असणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने आम्ही ग्रामस्थांच्या श्रमदानातून ह्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले आहे.

Exit mobile version